1) अर्जदाराने पतसंस्थेच्या पोट नियमाप्रमाणे कमीत कमी 20 भाग खरेदी केलेले असावेत व कर्ज घेताना कर्ज रकमेच्या 2.5% रकमेपर्यंतचे किंवा त्यापेक्षा जास्त भाग खरेदी करावे लागतील.
2) जामिनदार हा पतसंस्थेचा सभासद असला पाहिजे. सोनेतारण व ठेवीपोटी कर्ज वगळता सर्व प्रकारच्या कर्जास कमीत कमी दोन जामिनदार अनिवार्य असतील. एक सभासद दोघांना जामिन राहू शकतो. परंतु त्यांना पोटनियमाप्रमाणे आपल्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करावा लागेल. कायद्यानुसार जर कर्जदार घेतलेल्या कर्जाचे हफ्ते व्यवस्थित भरू शकला नाही, तर जामिनदाराला स्वत: सदर कर्जदाराचे थकलेले हप्ते व्याजासहीत भरावे लागतील. कर्जासाठी अर्ज करणारा सभासद नोकरी किंवा स्वत:ची शेती/धंदा करणारा पाहिजे.
3) कर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार संचालक मंडळास आहे.
4) मंजूर झालेले कर्ज काही कारणास्तव नामंजूर करण्याचा संचालक मंडळास अधिकार आहे.
5) ज्या कामासाठी कर्ज दिले असेल त्याशिवाय इतर कामाला कर्जाचा पैसा वापरला तर दिलेले कर्ज परत मागण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे.
6) एखादा कर्जदार थकबाकीदार झाला तर कर्जदाराच्या व जामीनदारांच्या कंपनीतून किंवा ऑफिसमधून कर्ज वसूल करण्याचा व त्यांची नावे जाहीर करण्याचा अधिकार संचालक मंडळाने राखून ठेवला आहे.
7) कर्जदाराने हप्ते चुकविल्यास त्या बद्दलची सूचना (नोटिस) जामिनदारांना देण्यास येईल, परंतु तशी नोटिस देण्यास पतसंस्थेवर बंधन नाही. आम्हांस नोटिस मिळाली नाही ही जामिनदाराची सबब ऐकली जाणार नाही. कर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरलेले आहेत किंवा नाहीत हे पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी जामिनदाराची आहे व अशा सभासदाने आपली जामिनदारी स्वत:च्या जबाबदारीने घ्यावी. प्रत्येक जामिनदार हा कर्जदाराने घेतलेल्या संपूर्ण कर्जास व व्याज रकमेस जबाबदार आहे. जर कर्जदाराने प्रत्येक महिन्याला हप्ता भरला नाही तर थकीत हप्त्यावर दंड व्याज व नोटिस फी आकारली जाईल. ती रक्कमही जामीनदाराला भरावी लागेल.
8) अर्ज भरल्यानंतर संचालकांचा शेरा घेणे आवश्यक आहे. शेरा नसल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही.
9) कर्ज खालील तारणांवर देण्यात येईल.
अ) नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट कर्ज
ब) सोन्याचे दागिने
क) जागा(सातबारा / घरपट्टी)
ड) मुदत ठेव किंवा आवर्त ठेव ह्यांच्या तारणावर
इ) वाहन
फ) विजेची उपकरणे
ग) सदनिका
ह) गाळा
10) कर्जाची परत फेड दिलेल्या मुदतीत करावी.
11) कर्जाचा अर्ज संपूर्णपणे भरलेला नसेल किंवा व्यवस्थित लिहिलेला नसेल तर तो रद्द केला जाईल.
12) प्रत्येक जामिनदार हा कर्जदाराने घेतलेल्या कर्जास जबाबदार आहे व कर्जदाराने कर्ज न भरल्यास ते कर्ज व व्याज जामिनदार भरेल हे समजून जामीनकी स्वीकारली जाईल.
13) नोकरी करणार्या कर्जदाराने व जामिनदाराने (महा. पतसंथा कायदा 1960 च्या 49 कलमाप्रमाणे) योग्य करार करावा लागेल.
14) कर्जासाठी अर्ज करणारा सभासद किमान 6 महीने सभासद असणे आवश्यक आहे.
15) कर्जाचा फॉर्म भरण्याअगोदर सभासदाने आपले बचत खाते उघडणे जरूरी आहे. खात्यावरील व्यवहार पाहूनच कर्ज मंजूर करण्यात येईल.
16) कर्ज अदा केल्यानंतर जामिनदाराला जामिनकी मागे घेता येणार नाही. जामिनकी मागे घ्यायची असल्यास कर्ज दाराला कर्ज रक्कम व्याजासहित पूर्ण भरावे लागेल.
17) कर्ज घेणाऱ्या सभासदाने एखाद्या कर्ज थकीत असलेल्या सभासदाची जामीनकी घेतली असल्यास त्या जमीनदाराची थकीत कर्ज रक्कम ही कर्ज घेणाऱ्या सभासदाच्या कर्ज रक्कमेतून वळती करण्यात येईल.
18) कर्जदाराचे सलग 3 हप्ते थकीत झाल्यास त्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 91 व 101 नुसार कारवाई करून कर्जाची व्याजासहित पूर्ण रक्कम संस्थेस तारण दिलेल्या मिळकतीची लिलाव/विक्री करून वसूल करण्यात येईल. कर्जदाराच्या मिळकतीची विक्री करून कर्ज रक्कम वसूल न झाल्यास जमीनदारांची मिळकत विक्री करून वसूल करण्यात येईल.
1) रेशनिंग कार्ड, इलेक्शन कार्ड
2) आधारकार्ड,पॅनकार्ड
3) घरपट्टी व असेसमेंट उतारा (original)
4) उत्पन्नाचा दाखला,आय टि रिटर्न(3वर्षे), पगार पावती (3 महीने)
5) फोटो ४ कॉपी
6) सातबारा उतारा, गटबुक, फेरफार, ८-अ चा उतारा 7) ग्रामपंचायत /सिडको/महानगरपालिका नाहरकत दाखला
8) करार पत्र/कुळमुखत्यात/खरेदीखत
9) आर सी बुक,परमिट,लायसन्स,बॅच,इन्शुरेंस पॉलिसी
10) व्यवसायचे विवरण पत्र/प्रोजेक्ट रीपोर्ट/आर्किटेक्ट प्लॅनिंग रीपोर्ट
11) क्लिअरन्स सर्टिफिकेट (कर्जविषयी NOC)
12) कोटेशन
13) सिबिल रीपोर्ट
14) सर्च रीपोर्ट
15) वॅल्यूएशन रीपोर्ट
16) फ्लॅटचे करार पत्र
17) बँक खाते उतारा-६ महीने (सर्व बँक खाती)
18) कुठल्याही बँकेत किंवा संस्थेत कर्ज असल्यास त्याचा पूर्ण कर्ज खाते उतारा.
19) घरातील व्यक्तींचे कर्ज घेण्यासाठी संमतीपत्र.
टीप :-
अ) तारणी कर्जाची रक्कम ही तारण ठेवलेल्या मिळकतीवर बोजा चढवल्या नंतरच अदा करण्यात येईल.
ब) कोणत्याही प्रकारच्या कर्जाची रक्कम ही चेकने अदा केली जाईल.
क) ज्या कारणासाठी कर्ज रक्कम घेतलेली आहे त्या कारणासाठी रक्कम अदा केल्यानंतर ,त्या रक्कमेची बिले किंवा पावत्या संस्थेत जमा करण्यात याव्या तरच त्यापुढील रक्कम अदा करण्यात येईल.
ड) मिळकतीवर बोजा चढविण्याची व उतरविणायची जबाबदारी कर्जदारची असेल.
सोने तारण कर्ज
वैयक्तिक,वैद्यकीय, व्यवसाय किंवा आपत्कालीन गरजांसाठी त्वरित निधीची आवश्यकता आहे का? पाथेय सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेकडून तुमच्या सोन्यावर त्वरित कर्ज मिळवा आणि ते न विकता त्याचे मूल्य अनलॉक करा.
आमचे सोने तारण कर्ज जलद प्रक्रिया, आकर्षक व्याजदर आणि तुमच्या सोन्याच्या दागिन्यांसाठी संपूर्ण सुरक्षितता देते.
गृह व तारण कर्ज
व्यवसाय विस्तार, शिक्षण, वैद्यकीय गरजा किंवा वैयक्तिक उद्दिष्टांसाठी निधीची आवश्यकता आहे का? पाथेय सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेकडून मिळणाऱ्या गृहकर्ज सुविधेसह, तुम्ही तुमची निवासी, व्यावसायिक किंवा खुली मालमत्ता तारण ठेवून कर्ज मिळवू शकता - आणि स्पर्धात्मक व्याजदरांसह लवचिक परतफेडीचा आनंद घेऊ शकता.
तुमच्या मालमत्तेची विक्री न करता तिच्या मूल्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास मदत करण्यासाठी आम्ही एक सोपी, पारदर्शक प्रक्रिया ऑफर करतो.
ठेव कर्ज
तुम्हाला तातडीने निधीची आवश्यकता आहे पण तुमची बचत खंडित करायची नाहीये?पाथेय सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेकडून ठेव कर्ज सुविधेसह, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवरील व्याज न गमावता तुमच्या मुदत ठेवीवर (एफडी) कर्ज मिळवू शकता.
तुमच्या ठेवीतून उत्पन्न मिळत असताना रोख रक्कम मिळवण्याचा हा एक स्मार्ट आणि सोयीस्कर मार्ग आहे.
व्यवसाय कर्ज
आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यवसायाला वाढण्याची संधी मिळायला हवी. तुम्ही नवीन उपक्रम सुरू करत असाल, व्यवहार वाढवत असाल किंवा दैनंदिन व्यवसायाच्या गरजा पूर्ण करत असाल तर पाथेय सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे व्यवसाय कर्ज तुम्हाला आर्थिक बळकटी आणि पाठिंब्यासह पुढे जाण्यास मदत करते.
जीवनात अनेक वेळा अचानक खर्च येतात – शिक्षण, वैद्यकीय खर्च, विवाहसोहळा, घरगुती आवश्यक वस्तू खरेदी, प्रवास किंवा इतर वैयक्तिक गरजा. अशा वेळी पाथेय नागरी सहकारी पतसंस्था (मुख्य कार्यालय CBS सोसायटी) घेऊन आली आहे वैयक्तिक कर्ज योजना, जी तुमच्या प्रत्येक गरजेत त्वरित मदत करेल.