सुवर्ण ठेव
(१८ महिने) ८.५% (अटी लागू)
पाथेय सहकारी पतसंस्थेची सुवर्ण ठेव योजना सभासदांना जास्त व्याज परतावा मिळण्यासाठी तयार केलेली आहे ज्यांना निश्चित रक्कम बचत करायला आवडते आणि सुरक्षित, स्थिर परतावा मिळवायचा आहे. तुम्ही भविष्यातील खर्चाचे नियोजन करत असाल, मुलांच्या शिक्षणाचे नियोजन करत असाल किंवा फक्त बचतीची सवय लावत असाल, ही योजना ते सोपे आणि फायदेशीर बनवते.
आमची सुवर्ण ठेव योजना तुम्हाला तुमची रक्कम जमा करण्याची आणि त्याची सुरक्षितता आणि पूर्ण मूल्य सुनिश्चित करून आकर्षक परतावा मिळविण्याची परवानगी देते.
आवर्त ठेव
५% (अटी आणि नियम लागू)
तुम्ही तुमची बचत टप्प्याटप्प्याने वाढवू इच्छिता? आमची आवर्ती ठेव योजना ही आकर्षक परतावा मिळवताना शिस्तबद्ध बचतीची सवय विकसित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
पाथेय सहकारी पतसंस्था येथे, आम्ही तुमच्यासाठी दरमहा लहान रक्कम गुंतवणे आणि परिपक्वतेच्या वेळी एकरकमी व्याजासह मिळवणे सोपे आणि फायदेशीर बनवतो.
आवर्त व लक्षाधीश ठेव खाते सभासद व त्यांच्या पाल्यांच्या नावानेही काढता येईल.
आवर्त व लक्षाधीश ठेव ठेवण्यासाठी खातेदाराचे बचत ठेव खाते असणे आवश्यक आहे.
आवर्त व लक्षाधीश ठेव अर्जावर खाते वापरण्यासंबंधी माहीती देणे आवश्यक आहे.
आवर्त ठेव खात्यामध्ये कमीत कमी रु.500/- व त्या पटीत प्रत्येक महिन्यास भरता येतील.
आवर्त ठेवची मुदत एक किंवा पाच वर्षाचीच असेल.
संस्थेच्या नियमाप्रमाणे त्यावर व्याज आकारले जाईल.
आवर्त व लक्षाधीश ठेव खाते मुदतीअगोदर बंद करता येणार नाही.
आवर्त व लक्षाधीश ठेव खाते संयुक्त नावानेही काढता येईल.
आवर्त ठेव खाते मुदतीअगोदर बंद केल्यास किंवा नियमित भरणा न केल्यास त्यावर व्याज आकारले जाणार नाही. तसेच 6 महिन्याच्या आत खाते बंद केल्यास त्यास व्याज दिले जाणार नाही.
आवर्त व लक्षाधीश ठेव खात्याची मुदतपूर्ण रक्कम रु.10,000/- च्या वर झाल्यास ती चेकने अदा केली जाईल.
लक्षधीश ठेव योजना ही संस्थेने दिलेल्या मुदतीनुसार तेवढ्या महिन्यात पूर्ण करावी लागेल.
लक्षधीश ठेव योजनेमध्ये नियमित रक्कम जमा करणे अनिवार्य राहील.
लक्षधीश ठेव योजनेच्या खात्यामध्ये अनियमीतपणा आल्यास त्यावर 2 टक्के दंड आकरला जाईल.तसेच खातेदाराने सदर खात्यामध्ये पैसे भरायचे बंद केल्यास किंवा खाते बंद करायचे झाल्यास ते मुदतीनंतरच बंद केले जाईल व त्यावर संस्थेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारले जाईल.
लक्षधीश ठेव योजनेच्या खातेदाराने कमीत कमी 6 महीने तरी खाते नियमित ठेवणे आवश्यक आहे. त्याअगोदर खाते बंद केल्यास व्याज मिळणार नाही. कोणत्याही परिस्थितीत खात्यावरील रक्कम ही खात्याची मुदत संपल्यावरच मिळेल .
आवर्त ठेव व लक्षाधीश ठेव योजनेच्या कार्डवर पैसे भरल्याची नोंद करून घेण्याची जबाबदारी ही खातेदाराची राहील. कार्ड हरवल्यास रु.100/- सर्विस चार्ज आकारून नवीन कार्ड देण्यात येईल.
दर महिन्याला कार्ड संस्थेमध्ये आणून पडताळणी करून घेण्याची जबाबदारी खातेदाराची राहील.
वरील नियमांत बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
दैनिक ठेव
४% (अटी आणि शर्ती लागू)
पाथेय सहकारी पतसंस्था मर्यादित ही संस्थने विशेषतः लहान व्यवसाय मालक, व्यापारी, विक्रेते आणि दररोज थोडीशी बचत करू इच्छिणाऱ्या आणि सुरक्षित आर्थिक भविष्य घडवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी तयार केलेली आहे.
ही योजना दैनिक संकलनाच्या सोयीसह नियमित बचतीला प्रोत्साहन देते - तुमच्या दैनंदिन उत्पन्नाचे दीर्घकालीन संपत्तीत रूपांतर करण्यास मदत करते.
दैनंदिन ठेव खाते नियम
या योजनेमध्ये 1 आणि 2 वर्षाकरिता ठेव स्वीकारली जाईल. 1 आणि 2 वर्षाच्या मुदतीकरिता रोज कमीत कमी 50 रुपये भरावे लागतील.
खतेदारास दैनंदिन ठेव खात्यांत रोज भरणा करावा लागेल. सुट्टीच्या दिवसाचा भरणा त्याच्या दुसरे दिवशी करावा लागेल. त्यामुळे वर्षाचे सर्व दिवशी भरणा केला असे दाखविता येईल. आपण खात्यात कसे भरणा करणार हे खाते उघडताना स्पष्ट करावे लागेल व तशी नोंद करून घ्यावी लागेल. रोजचा भरणा जमा करून घेण्याकरता पतसंस्था आपला अधिकृत प्रतिनिधि खातेदाराच्या घरी किंवा अन्य सोईस्कर ठिकाणी पाठविण्याची व्यवस्था करेल. या अधिकृत प्रतिनिधी जवळ त्याचे छायाचित्र व सही असलेले व पतसंस्थेने खातरजमा केलेले ओळखपत्र असेल असे प्रतिनिधी पाठविण्याचा पतसंस्था शक्यतो प्रयत्न करणार असली तरी काही कारणाने प्रतिनिधी येऊ न शकल्यास रोजचा भरणा रोज करण्याची जबाबदारी खातेदाराची राहील.
या खात्यावरील व्याजाची आकारणी करताना 9 महिन्याच्या शिल्लक रकमेवर व्याज आकारले जाणार नाही.या ठेवीवर 1 व 2 वर्षाकरिता सुमारे 4 टक्के व्याज मिळेल.
खाते उघडल्यापासून 7 महिन्यांच्या आत बंद केले तर खात्यातील जमा रककमेच्या 3 टक्के रक्कम दंड म्हणून कापून घेण्यात येईल व जमा रकमेवर व्याज दिले जाणार नाही. तसेच 1 वर्ष मुदत पूर्ण होईपर्यंत व्याज दिले जाणार नाही, मुदतीनंतर 15 दिवसांनी रक्कम व्याजासह दिली जाईल. त्याअगोदर हवी असल्यास 1 टक्के व्याज कमी दिले जाईल.
2 वर्ष मुदतीच्या ठेवीकरीता जर 12 महिन्यानंतर परंतु मुदतपूर्व काढली तर जमा रकमेवर 7 टक्के व्याज दिले जाईल. 12 महिन्यानंतरच्या रककमेवर व्याज दिले जाणार नाही.
खातेदारास पासबुक दिले जाईल आणि त्यात रोजच्या भरण्याची नोंद केली जाईल. खातेदाराने त्या पासबुकातील नोंदी तपासून पहाव्यात व त्या अधिकृत प्रतिनिधीच्या सहिने झाल्या असल्याची खात्री करावी. खातेदाराने दर महिन्यातून एकदा पासबुक तपासणीसाठी ते पतसंस्थेच्या अधिकाऱ्याकडे द्यावे.पासबुक तपासणीसाठी संस्थेमध्ये न आणल्यास किंवा न दिल्यास त्यामधील न तपासलेल्या रक्कमांची सर्वस्वी जाबबाबदरी खातेदाराची राहील. पासबुक हरवले किंवा खराब झाले तर नवीन पासबुकासाठी 50 रुपये आकार द्यावा लागेल.
आपल्या खात्यात जमा होणारी रक्कम तपासणीसाठी दर महिन्याने आपले पासबुक शाखेत देऊन आपली शिल्लक बरोबर असल्याची खात्री करून घेणे.
जर काही खातेदारास त्याच्या खात्यात भरणा करणे शक्य झाले नाही तर जास्तीत जास्त 6 आठवडे तो त्याचे खाते पैसे न भरता चालू ठेवू शकतो व त्यानंतर त्यास पुन्हा त्या खात्यात भरणा करता येतो. परंतु ही सवलत घेण्यापूर्वी खातेदाराने संस्थेत ही मुदत कळविली पाहिजे.
वरील नियमांत पुर्वसूचना न देता बदल करण्याचा अधिकार संस्थेने स्वत:कडे राखून ठेवला आहे.
मुदत पूर्ण झाल्यानंतरच व्याज दिले जाईल अन्यथा व्याज दिले जाणार नाही.
मुदत पूर्ण झालेल्या तारखेपासून 15 दिवसानंतर दैनंदिन ठेवीची रक्कम परत देण्यात येईल.
शेवटच्या महिन्यात जमा झालेल्या रककमेवर व्याज आकारले जाणार नाही.
जी रक्कम दैनंदिन ठेव खात्यात दररोज भरणा करणार आहेत त्या व्यतिरिक्त ज्यादा रक्कम खात्यामध्ये स्वीकारली जाणार नाही. जरी ज्यादा रक्कम जमा केल्यास त्यावर व्याज दिले जाणार नाही.
मुदतीनंतर दैनंदिन ठेव जमा रक्कम रु.10,000/- च्या वर असल्यास ती रक्कम चेकने अदा करण्यात येईल.
मुदतीनंतर खातेदाराने स्वत: संस्थेत येऊन रक्कम काढून घ्यावी. ती अधिकृत प्रतिनिधि मार्फत मागितल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी खातेदाराची राहील.

(९ वर्षे ७ महिने)
तुमचे पैसे वाढवण्यासाठी सुरक्षित आणि हमीचा मार्ग शोधत आहात का? पाथेय सहकारी पतसंस्था (एच.ओ. सीबीएस सोसायटी) कडून डबल डिपॉझिट स्कीममुळे, तुमची गुंतवणूक रक्कम निश्चित कालावधीत दुप्पट होते - तुम्हाला मनःशांती आणि खात्रीशीर परतावा मिळतो.
ही योजना अशा व्यक्तींसाठी आदर्श आहे ज्यांना आजच एकरकमी रक्कम गुंतवायची आहे आणि मुदतपूर्तीच्या वेळी दुप्पट मूल्य मिळवायचे आहे.
पेन्शन ठेव
सुरक्षित आणि शांत निवृत्तीसाठी नियोजन करत आहात का? पाथेय सहकारी पतसंस्थाची पेन्शन ठेव योजना तुम्हाला तुमच्या निवृत्तीचा सन्मानाने आणि आर्थिक स्वातंत्र्याने आनंद घेण्याची खात्री देते.
ही योजना विशेषतः एक-वेळ ठेवीतून निश्चित मासिक उत्पन्न प्रदान करण्यासाठी तयार केलेली आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्तीनंतर नियमित परतावा मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक परिपूर्ण उपाय आहे.
पेन्शन ठेव ठेवण्यासाठी खातेदाराचे बचत ठेव खाते असणे आवश्यक आहे.
पेन्शन ठेव योजनेचे व्याज दर महिण्याच्या शेवटच्या दिवशी बचत खात्यावर जमा करण्यात येईल .
कोणाही सभासदास कमीत कमी रु. 10,000/- पर्यन्त व जास्तीत जास्त रु.1,75,000/- पर्यन्त ठेव ठेवता येईल.
पेन्शन ठेव ठेवताना संयुक्त नावानेही पेन्शन ठेव ठेवता येईल. त्यासाठी संयुक्त खतेदारचे देखील बचत ठेव खाते असणे आवश्यक आहे.
पेन्शन ठेव ठेवताना वारसदार नेमणे आवश्यक आहे. संयुक्त खातेदरालाही वारस नेमता येईल.
पेन्शन ठेव अर्जावर खाते वापरण्यासंबंधी माहीती देणे आवश्यक आहे.
पेन्शन ठेव खाते मुदती अगोदर बंद करता येणार नाही.
पेन्शन ठेव योजना मध्येच बंद करावयाची असल्यास त्या वेळेला ठेवीसाठी जो अवधी झाला असेल त्या अवधीला त्या वेळी असणाऱ्या व्याजदराच्या 2 टक्के व्याज कमी आकारले जाईल ह्याची नोंद घ्यावी. व त्या हिशोबाने आपणास अदा केलेले व्याज हिशोबत घेऊन कमी पडणारी रक्कम आपल्या मुद्द्ल मधून वजा करून शिल्लक रक्कम देण्यात येईल. ( उदा पेन्शन ठेव 8 टक्के दराने असेल व बंद कालावधी 4 टक्के असेल तर आपणास अदा केलेले 4 टक्के जादा व्याज आपल्या ठेव रक्कमेमधून वजा केले जाईल )
रु.10,000/- वरील पेन्शन ठेवची रक्कम चेकने अदा केली जाईल.
पेन्शन ठेव खात्याची मुदत पूर्ण रक्कम ही बचत खात्यावर वर्ग करूनच अदा केली जाईल.
कोणत्याही पेन्शन ठेव योजनेची पावती दुसऱ्या मुदत ठेव योजनेमध्ये वर्ग करताना चालू दिनांकापासूनच वर्ग केली जाईल. त्यास त्या पावतीची मुदत दिनांक मिळणार नाही.
पेन्शन ठेव नूतनीकरण करताना ठेवीवरील व्याज हवे असल्यास नूतनीकरण केलेल्या मुदत ठेवीस चालू दिनांकापासून व्याज आकारणी होईल.
पावती हरविल्यास संस्थेकडे तसे लेखी कळविले पाहिजे. पतसंस्था नियमाप्रमाणे हमीपत्र घेऊन रक्कम अदा केली जाईल.
पतसंस्थेने पेन्शन ठेवीबाबत तयार केलेले नियम खातेदारास मान्य आहेत हे गृहीत धरूनच पावती देण्यात येईल.
मुदत भरण्यापूर्वी रक्कम परत करणे किंवा व्याज देणे न देणे व्यवस्थापक समितीच्या अधिकारात राहील.
वरील नियमांत बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
मुदत ठेव
तुमचे पैसे वाढवण्याचा सुरक्षित मार्ग शोधत आहात का? पाथेय सहकारी पतसंस्था मधील मुदत ठेव योजना तुम्हाला हमी परतावा, लवचिक मुदतीचे पर्याय आणि मनःशांती देते.
तुम्ही भविष्यातील ध्येयासाठी बचत करत असाल किंवा तुमचे पैसे सुरक्षितपणे वाढावेत असे वाटत असेल, तर आमची मुदत ठेव योजना व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि व्यवसायांसाठी एक परिपूर्ण गुंतवणूक पर्याय आहे.
मुदत ठेव ठेवण्यासाठी खातेदाराचे बचत ठेव खाते असणे आवश्यक आहे.
कोणाही सभासदास कमीत कमी रु.500/- पर्यन्त व जास्तीत जास्त रु.1,75,000/- पर्यन्त ठेव ठेवता येईल.
मुदत ठेव ठेवताना संयुक्त नावानेही मुदत ठेव ठेवता येईल. त्यासाठी संयुक्त खतेदारचे देखील बचत ठेव खाते असणे आवश्यक आहे.
मुदत ठेव ठेवताना वारसदार नेमणे आवश्यक आहे. संयुक्त खातेदरालाही वारस नेमता येईल.
मुदत ठेव अर्जावर खाते वापरण्यासंबंधी माहीती देणे आवश्यक आहे.
मदत ठेव खाते मुदती अगोदर बंद करता येणार नाही.
कोणत्याही योजनेची मुदत ठेव मध्येच बंद करावयाची असल्यास त्या वेळेला ठेवीसाठी जो अवधी झाला असेल त्या अवधीला त्या वेळी असणाऱ्या व्याजदराच्या 2 टक्के व्याज कमी आकारले जाईल ह्याची नोंद घ्यावी.
रु.10,000/- वरील मुदत ठेवची रक्कम चेकने अदा केली जाईल.
मुदत ठेव खात्याची मुदत पूर्ण रक्कम ही बचत खात्यावर वर्ग करूनच अदा केली जाईल.
पावती हजर केल्याशिवाय मुदत ठेव रक्कम किंवा व्याज दिले जाणार नाही.
कोणत्याही मुदत ठेव योजनेची पावती दुसऱ्या मुदत ठेव योजनेमध्ये वर्ग करताना चालू दिनांकापासूनच वर्ग केली जाईल. त्यास त्या पावतीची मुदत दिनांक मिळणार नाही.
मुदत ठेव नूतनीकरण करताना ठेवीवरील व्याज हवे असल्यास नूतनीकरण केलेल्या मुदत ठेवीस चालू दिनांकापासून व्याज आकारणी होईल.
पावती हरविल्यास संस्थेकडे तसे लेखी कळविले पाहिजे. पतसंस्था नियमाप्रमाणे हमीपत्र घेऊन रक्कम अदा केली जाईल.
पतसंस्थेने मुदत ठेवीबाबत तयार केलेले नियम खातेदारास मान्य आहेत हे गृहीत धरूनच पावती देण्यात येईल.
मुदत भरण्यापूर्वी रक्कम परत करणे किंवा व्याज देणे न देणे व्यवस्थापक समितीच्या अधिकारात राहील.
वरील नियमांत बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.
पतये नागरी सहकारी पतसंस्था (मुख्य कार्यालय CBS सोसायटी) आपल्यासाठी घेऊन आली आहे बचत ठेव योजना, जी तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आदर्श आहे. नियमित बचतीमुळे तुम्ही छोट्या रक्कमांमधूनही मोठी आर्थिक शाश्वतता साधू शकता.
बचत ठेवीविषयी नियम :
कोणाही व्यक्तीस कमीत कमी रु. 500/- भरून बचत खाते उघडता येईल.
खाते उघडताना तीन फोटो व आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड ह्यांची झेरॉक्स (दोन प्रती) व ओळखीची सही आवश्यक असेल. तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड ह्यांची सत्यप्रत संस्थेत पडताळणीसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.
बचत ठेव अर्जावर खाते वापरण्यासंबंधी माहीती देणे आवश्यक आहे.
कोणाही व्यक्तीस आपल्या नावाने खाते उघडता येईल.
दोन किंवा जास्त व्यक्तींच्या नावाने संयुक्त खाते उघडता येईल. अशा खात्यावर व्यवहार कोण करणार या बद्दल स्पष्ट सूचना नमूद करावी लागेल. वारसाची नोंद करता येईल.
अज्ञानाच्या नावाने पालकांस खाते उघडता येईल.
बचत खात्यावर भरणा करावयाची रोख रक्कम पूर्ण रुपयात असली पाहिजे.
सदर खात्यात खातेदाराच्या नावाने असलेले चेक्स, डिव्हिडंड वॉरेंट जमेसाठी स्वीकारली जातील.
खात्यात पैसे भरताना अथवा काढताना पासबुक हजर करणे आवश्यक आहे. पासबुक हरवल्यास त्याऐवजी दुसरे पासबुक दिले जाईल. त्याबद्दल खातेदारास रु.50/- मात्र फी भरावी लागेल. असे पासबुक चालू वर्षीच्या सुरवातीपासून दिली जाईल(1 एप्रिल). एक पासबुक संपल्यावर दुसरे पासबुक देतेवेळी कोणताही आकार घेतला जाणार नाही.
खाते बंद केल्यास खातेदाराकडून रु.50/- सर्विस चार्ज म्हणून वसूल केले जातील.
खात्यातून रु.10,000/- पेक्षा जास्त रक्कम काढण्यास खातेदाराला प्रत्यक्ष संस्थेत यावे लागेल व रु.10,000/- पेक्षा जास्त रक्कम चेकने अदा केली जाईल.
बचत ठेवीवर मार्च व सेप्टेंबर महिन्यात असे वर्षातून दोन वेळा सहामाही व्याज दिले जाईल. द.सा.द.शे. 4% दाराने व्याज दिले जाईल. बचत खात्यामध्ये कमीत कमी रु.500/- शिल्लक किंवा कमीत कमी रु.5/- व्याज आकारणी असेल तरच व्याज दिले जाईल.
कृपया खातेदाराने पैसे काढण्याच्या पावतीवर बचत खाते उघडताना अर्जावर जी सही केली असेल तीच सही करावी लागेल/असणे गरजेचे आहे. अन्यथा सही चुकीची असल्यास पैसे काढता येणार नाही.
पैसे काढण्याच्या पावतीवर कोणत्याही प्रकारची खाडाखोड चालणार नाही.
पैसे काढण्याच्या वेळी जर खातेदाराची K.Y.C. पूर्ण नसेल तर त्या खातेदारास पैसे काढता येणार नाहीत.
वरील नियमांत बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील.